उद्योगविजय

उद्योगविजय ची सुरुवात करण्याची प्रेरणा समाजातील काही घटकांकडून भेटली आहे.उद्योगाबद्दल आपल्या देशात आणि विशेष करून महाराष्ट्रमध्ये खूपच उद्योगाला दुजाभाव म्हणा किंवा दुय्यम दर्जा दिला जातो. प्रत्येक व्यक्तीकडे खूप प्रचंड बौद्धीक क्षमता असते. पण ते आपल्या क्षमतेला विकसित न करता फक्त चाकोरीबद्ध आयुष्य जगायचा प्रयत्न करत असतात. भारत सोडून इतर देशात जसे कि,अमेरिका, जर्मनी ,चीन ,फिनलँड इत्यादि यासारख्या प्रगत देशांमध्ये उद्योगाला आणि नवीन संशोधनाला खूप वाव दिला जातो. भारतात फक्त खाजगी नोकरी आणि सरकारी नोकरी यामध्ये भारतातला तरुण गुंतला आहे. पण ,जगभरातल्या इतर संधीकडे काही तरुण अपवाद सोडले तर आपले तरुण बघत नाहीत हि खूप मोठी शोकांतिका आहे.
सर्व उद्योगाबद्दलची माहिती आणि त्यात येणाऱ्या अडचणी याबद्दल आपण या ब्लॉग मध्ये बोलणार आणि लिहणार आहोत.

उद्योजक म्हणजे काय ?

उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी एक नवीन व्यवसाय तयार करते, बहुतेक जोखीम पत्करते आणि बहुतेक बक्षीसांचा आनंद घेते. व्यवसाय स्थापित करण्याच्या प्रक्रियेस उद्योजकता म्हणून ओळखले जाते. उद्योजक सामान्यत: एक नवीन शोधक, वस्तू, सेवा आणि व्यवसाय / किंवा प्रक्रियेचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते.

उद्योजक होण्याचे कोणते फायदे आहेत ?

आपण आपले स्व:ताचे मालक आहात.
आपली उत्पन्न मिळवण्याची क्षमता अमर्यादित आहे.
आपण कुठे आणि केव्हा काम करायचे ते निवडतात.
आपण आपले आवडते काम करून पैसे कमवता.
आपण लोकांच्या जीवनावर परिणाम घडवून आणता.
तुम्ही एक नेता बनून मार्गदर्शन करू शकता.
आपण सतत आपली प्रगती करत असतात.
आपण आपल्या स्वत: च्या अटींनुसार जीवन जगता.

उद्योजकाला व्यवसायात येणाऱ्या जोखिमी / समस्या.

चुकीची मुख्य व्यवसाय नीती.
व्यवसायातील कायदेशिर नियमांचे पालन न करणे.
व्यवस्थापकीय समस्या हाताळता न येणे.
व्यवसायातील आर्थिक समस्या / अडथळे सोडवता न येणे.
अपयशी व्यवसायामुळे होणारी प्रतिष्ठेची हानी.
सातत्याने बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात न करणे.
नैसर्गिक आपत्ती मुळे बाजारातील होणारी चढ उतार.
व्यवसायाला अनुसरून अनुभवी / कुशल कामगार नसणे.